पत्रकारांचा स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याच्या मागणीसाठी संगमनेर तालुका व अकोले तालुका पञकारांचे निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 जुलाई 2018

पत्रकारांचा स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याच्या मागणीसाठी संगमनेर तालुका व अकोले तालुका पञकारांचे निवेदन.


आश्वी बु/प्रतिनिधी (अमोल राखपसरे )                                        ज्याप्रमाने शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकांचे राखीव मतदार संघ आहेत, पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदवीधर मतदार संघ आहेत त्याच धर्तीवर पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी "पत्रकारांचाही स्वतंत्र मतदार संघ असलाच पाहिजे" अशी  महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आग्रही मागणी करण्यात आली आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार  स्तंभ आहे.पत्रकार स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वृतसंकलन करतोच शिवाय त्यांच्याही अनेक प्रलंबित व न्याय मागण्या आहेत.त्या सोडविण्यासाठी व प्रगल्भ लोकशाही निर्माण होण्यासाठी आणि पत्रकारांचा हक्काचा लोकप्रतिनिधी असावा यासाठीच  पत्रकारांचा स्वतंत्र मतदार संघ व्हावा म्हणून  दिनांक 02/07/2018 रोजी  महाराष्ट्र पञकार संघाच्या वतीने  निवेदन देण्यात आले आहे.त्यामुळे जुलै महिण्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून पञकारांनी केलेल्या मागणीचा विचार व्हावा अशी मागणी करणारे दोन निवेदन संगमनेर व अकोले तालुका पञकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.याबाबतीत उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात येऊन आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र पञकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.रामनाथ जर्हाड अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मा.अमोल राखपसरे संगमनेर तालुका अध्यक्ष मा.संजय नवले संगमनेर तालुका ग्रामीण अध्यक्ष मा.भारत म्हसे संगमनेर तालुका कार्याध्यक्ष मा.अशोक वेरूडे सदस्य मा.चकोर अकोले तालुका कार्यकारिणील अध्यक्ष शांताराम दराडे संतोष साळवे चंद्रकांत सानप रेश्मा येलमामे रणजित ऊगले राहुल शिंदे व आदि उपस्थिती होती.पञकार संघाच्या वतीने करण्यात आलेल्या स्वतंत्र पञकार मतदार संघाच्या मागणीला अनेक राजकीय पुढा-यांनी पांठिबा दर्शविला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें