आषाढी एकादशी निमित्त विठू नामाची शाळा भरली.माऊलीच्या गजराने दुमदुमली अवघी सुवर्ण नगरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 23 जुलाई 2018

आषाढी एकादशी निमित्त विठू नामाची शाळा भरली.माऊलीच्या गजराने दुमदुमली अवघी सुवर्ण नगरी.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि. २३जुलै २०१८
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरात महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातून भाविक भक्त एकवटले असून गावोगावची मंदिरे सुद्धा पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या रांगांनी फुलून आल्याचे चित्र दिसते.
आज सोमवार रोजी आषाढी एकादशी निमीत्त ह. भ.प. रंगनाथ महाराज सोनपेठकर यांची जन्मभूमी असलेल्या सोनपेठ नगरीतील विविध शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची पारंपारिक वेशभूषा धारण करून आपापल्या शाळेतून दिंडी काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या ज्ञानोबा-माऊली-तुकारामाच्या नामाने व टाळ मृदंगाच्या गजराने अवघे सोनपेठ शहर दुमदुमून गेले होते. ह.भ.प.रंगनाथ महाराज गुरूजी समाधी मंदीर व विठ्ठल रूखूमाई मंदीर येथे फुलाची सजावट करण्यात आली होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें