चारठाणा येथील उपसरपंचाच्या राजीनामा प्रकरणी बोलवलेली ग्रा.पं.ची विशेष सभा अखेर सदर राजीनामा विहीत नमुन्यात न दिल्याने व उपसरपंच ह्या सभेस अनुपस्थीत राहील्याने बारगळली आहे.
चारठाणा येथील उपसरपंच हफीजाबी शेख मदार यांनी मागच्या दि.३० जुन रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्या अनशंगाने राजीनाम्याची शहनिशा करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते परंतु सदरील बैठकीस उपसरपंच गैरहजर राहील्याने सदर बैठक रद्द करण्यात आल्याचे सरपंच व ग्रामसेवकांने जाहीर केले.तसेच सदर बैठक उद्या दुपारी दोन वाजता घेण्यात येईल असे सांगीतले. दरम्यान उपसरपंच सदरील बैठकीस अनुपस्थीत राहिल्याने राष्ट्रवादीच्याच सदस्यांनी नाराजी व्यक्त करुन आमदार विजय भांबळे यांनी आदेश देउनही संबधिताकडुन त्याची अाम्लबजावणी होत नसल्याने संताप व्यक्त केला.दरम्यान सभा सुरु असतांना सरपंच बि.जी.चव्हाण यांनी संबधिताशी संर्पक साधला असता उद्या बैठक ठेवा उपस्थीत राहु असे सांगीतल्याने दि.११ जुलै रोजी पुन्हा विशेष सभा बोलविण्यात आली अाहे.
एकंदरीत या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरु असुन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांची गटबाजी चांगलीच चव्हाट्यावर आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें