निफाड -वि.प्रतिनिधी.आमोल राखपसरे.
येथील निफाड इंग्लिश स्कूल, निफाडची पालक- शिक्षक संघाची सभा शालेय चेअरमन नंदलालजी चोरडीया यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यात देवीदास बैरागी यांची संघाच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
शालेय मुख्याध्यापिका सौ. मीना वाळुंजे, पर्यवेक्षक शंकर सोनवणे यांनी बैरागी यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी पालक शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन संघाचे सचिव भाऊराव भोये यांनी केले तर आभार सहसचिव सौ. कुमावत यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें