रामेश्वर-ओखा रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्य,सेलू रेल्वेस्थानका जवळील घटना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 30 जुलाई 2018

रामेश्वर-ओखा रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्य,सेलू रेल्वेस्थानका जवळील घटना.


सेलू !प्रतिनिधी

 रामेश्वर हुन ओखा कडे जाणाऱ्या रेल्वे समोर एकजण आल्यामुळे सेलू स्थानकाजवळ मृत्यू झाल्याची घटना दि. २९जुलै रोजी सकाळी ९•१० वाजता घडली.   याबाबतची माहिती याप्रमाणे  रामेश्वर हून ओखा कडे जाणा-या एक्सप्रेस रेल्वे  परभणी हून  औरंगाबाद कडे जात असताना  सेलू रेल्वे स्थानकाजवळ   फुलेनगर येथील रहिवाशी हरिचंद्र मारोतराव काटे वय ५४ वर्षे यांचा रेल्वे पटरी ओलांडून जात असताना रेल्वेची धडक बसल्याने जागीच  मृत्यू झाला.  सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सेलू रेल्वे पोलीस चौकीत  १९\२०१८  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत हरिचंद्र काटे यांच्यावर फुलेनगर येथील स्मशानभूमीत दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे फुलेनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास सेलू रेल्वे पोलीस चौकीचे कॉन्स्टेबल बालासाहेब थिटे हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें