गौरव सेवाभावी संस्था सेलु द्वारा संचलित यासेर उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी आज सेलु येथिल स्वामी रामानंद तिर्थ हिंदी मराठी ग्रंथालयास भेट दिली.
वाचनाची आवड या उपक्रमानिमित्त यासेर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तिर्थ हिंदी मराठी ग्रंथालयास भेट देऊन माहिती घेतली. यावेळी ग्रंथालयाचे सहाय्यक ग्रंथपाल पंडित शामराव जगाडे आणि लिपिक विलास शिंदे आणि दैनिक सकाळ या वृत्तपत्राचे पत्रकार संजय मुंढे यांचे शाल देऊन सत्कार केला आणि ग्रंथालयास डॉ. अब्दुल कलाम यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी सहाय्यक ग्रंथपाल जगाडे यांच्याशी शाळेतील विद्यार्थ्यांनी संवाद साधुन ग्रंथालयाविषयी आणि त्यांच्या कामाविषयी सविस्तर माहिती विचारली. विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सहाय्यक ग्रंथपालाने उत्सुकतेने दिली.
हा उपक्रम राबवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा न.प सदस्य तसेच अल्पसंख्यांक संस्थाचालक संघ परभणी चे अध्यक्ष पठाण रहिम खान ख़ैरुल्ला खान यांनी अभिनंदन केले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्याक पठाण जावेद खान फेरोज़ खान, सय्यद अज़ीम, सय्यद ईमरान , सय्यद अमन आदींनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें