साई भक्तांनकडून साईच्या झोळीत भरभरून दान,
शिर्डी( प्रतिनिधी )राजेंद्र दुनबळे
साईबाबा संस्थान गुरुपोर्णिमाच्या उत्सव काळात चार दिवसात लाखो साईभक्तांनी साईंचे दर्शन घेऊन साईंच्या समाधीचे दर्शन करून साईंच्या दानपेटीत जवळ पास विविध माध्यमातून ६कोटी ४०लाख रुपयाचे देणगी संस्थानला प्राप्त झालेची माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले या काळात जवळ पास ४३८.६५० ग्रॅम सोने तर ९३५३ग्रॅम चांदी असे १४लाखाचे सोने चांदी साईभक्तांनी संस्थानला दान केले असुन परकीय चलनाच्या रुपाने ११लाख रुपये संस्थानला मिळाले असुन साईबाबा संस्थानकडे २१८०कोटी रुपयांची विविध बैंकेत गुंतवणूक केली असुन संस्थानकडे आज अखेर ४२५किलो सोने व ४७००किलो चांदी असुन साई भक्तांच्या सेवे साठी विविध उपक्रम संस्थान राबवित असल्याचे संस्थांच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले
गुरु पोर्णिमाच्या उत्सवाच्या काळात २.५० लाख साईभक्तांनी भोजनाचा लाभ घेतला ३लाख मोफत बुंदी पाकिट भक्तांना मोफत वाटण्यात आले
२.५०लाख बुंदी लाडु किक्रीतुन ६२लाख रुपये संस्थानला मिळाले असुन दान पेटीत ३कोटी ८३लाख ४०हजार रोख. देणगी १कोटी ५७लाख ७२हजार रुपये तर चेक आणि डि.डिच्या माध्यमातून २९लाख तर ऑनलाईन देणगीच्या माध्यमातून ६१लाख रुपये असे भरभरुन दान या चार दिवसात शिर्डीत आलेल्या साईभक्तांनी साईंच्या झोळीत टाकुन साईंच्या दानातील होणारी ही वाढ साईभक्तांची श्रध्दा किती अतुट आहे हेच दाखवून देत आहे साईसंस्थाच्या निवास व्यवस्थाचा चार दिवसात ८०हजार भाविकांनी लाभ घेतला लवकरच मंदिर व परीसरात सि.सि.टिव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे साईबाबा संस्थानच्या माध्यमातून राज्य सरकारला सामाजिक कामासाठी मदत करण्यात आली आहे त्या बरोबर साईनाथ हाॅस्पिटलच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात लाखो रुग्णांना याचा लाभ झालेला आहे साईबाबा सुपर स्पेशालिस्ट हाॅस्पिटलमध्ये आधुनिक यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे त्या हाॅस्पिटलमध्येही लाखो भाविक महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोक उपचार घेतात शिर्डीसह लगतच्या परिसरातही संस्थान मदतीच्या माध्यमातुन योगदान देत असुन साईभक्तांच्या हितासाठी विविध उपक्रम संस्थान राबवित आहे या काळात संस्थाने सुरक्षेसाठी जी उपयोजना केली होती त्या मुळे मंदिर सुरक्षेचे प्रमुख आनंद भोईटे यांनी २८पाकिटमार यांच्यावर कारवाई केली संस्थान व्यवस्थान शैक्षणिक बाबदही मोठ्या प्रमणावर योगदान देत असल्याचे सांगुन साईसंस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थान कामकरत असल्याचे सांगितले या वेळी संस्थानचे अधिकारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें