सेलू :- मराठा आरक्षणासाठी व इतर मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला असून याचे पडसाद सेलूतही दिसुन येत आहे.
आज दि. 30 जुलै पासून तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी कुंडी व म्हाळसापुर येथील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला असून ठोस निर्णय होई पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार मराठा बांधवांनी व्यक्त केला. ठिय्या आंदोलनात सहभागी आंदोलक मुक्कामी रहाणार असल्याने तहसील कार्यालयातच भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें