बनावट कागदपत्रांच्या आधारे पदस्थापना मिळवलेल्या कर्मचाऱ्यांची अखेर गच्छंती.
सेलू प्रतिनिधी
शमशेर खान
पाथरी नगरपरिषदेत कर्मचारी असल्याचे भासवून एकतर्फी बदली करण्याचा डाव करून सेलू नगरपरिषदेत मुकादम या पदावर रुजू झालेल्या त्या कर्मचाऱ्यांचे वृत्त प्रसिद्ध होताच सेलू नगरपालिकेत प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ निर्माण झाली असून मुख्याधिकार्यांनी तात्काळ बंद खोलीमध्ये बैठक घेऊन संबंधित कर्मचाऱ्यास कामावर न येण्या याबाबतचे लेखी आदेश दिल्याचे वृत्त आहे सविस्तर माहिती अशी की शेख शफी शेख मुजीब हा कंत्राटी कामगार पाथरी नगरपालिकेत मुकादम या पदावर कार्यरत होता असे असल्याबाबतचे बनावट कागदपत्रे तयार करून पाथरी नगरपरिषदे मधून सेलू नगर परिषदेमध्ये एकतर्फी बदली करून घेऊन सेलू नगरपरिषदेत मुकदम या पदावर रुजू होणार्या शेख शफी बाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच सेलू नगर परिषदेत प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ निर्माण झाली याबाबत दिलीप डासाळकर यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करताच व त्याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच नगर पालिका प्रशासनात मोठ्या हालचाली झाल्या व सदरील प्रकरण आपल्या वर येऊ नये याकरिता कारस्थान करून शेख शफी शेख मुजीब या मुकदम या पदावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यास 11 july 2018 रोजी पासून कामावर न येण्याची लेखी आदेश दिलेले आहेत त्यामुळे आपण केलेल्या चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला असला तरी आपण केलेली ही चूक होती हेच यावरून सिद्ध होते
सदरील कर्मचाऱ्यास सेलू नगरपालिकेने कामावर न येण्याचे आदेश दिले असले तरी 1जानेवारी 2018 ते आजपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याने उचललेल्या वेतनाबाबत चा त्यावर झालेल्या शासकीय खर्चाचा आणि इतर दिलेल्या भत्यांचा प्रश्न मात्र कायम राहतो शिवाय नगराध्यक्षयांनी सर्वसाधारण सभेत कर्मचाऱ्यास देण्याबाबतचा ठराव आणि कामावर रुजू होणे बाबतचे मुख्याधिकार्यांनी दिलेले लेखी आदेश याबाबत संबंधित दोघांविरुद्ध काय कारवाई होते याबाबत सेलूकर मोठ्या चवीने चर्चा करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें