चारठाणा.( प्रभाकर कुर्हे )
येथुन जवळच जिंतुर - जालना रस्त्यावर असलेल्या पिंपरी येथील जोड पुलावरील वळण रस्त्यावर मोटार सायकल स्वाराला अज्ञात वाहनांने धडक दिल्याने संबधित मोटार सायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी दिडच्या सुमारास घडली.
याबाबात अधिक माहिति अशी की, जिंतुर तालुक्यातील मौजे वर्णा येथील प्रसाद विनायक अंभुरे वय ३६ हे मोटार सायकल वर जात असतांना चारठाणा येथुन २ कि.मी.अंतरावर पिंपरी गावा जवळील एका जोड पुलात अज्ञात वाहानांने त्यांना जोराची धडक दिली .त्यात त्यांना गंभीर जखमी अवस्थेत जिंतुरला हलविण्यात आले परंतु डाॅक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले.
सदर अपघाताची माहीती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी डि.आर.झाडे,बळीराम इघारे, डि.के.मोरे, डि.डी.बुकरे यांनी घटनास्थळी भेट देउन संबधित इसमास तातडीने जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकार्यानी त्यास मयत घोषीत केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें