'रणजित' यांचा हरवलेला मोबाईल 'इरफान' ने दिला परत....! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 जुलाई 2018

'रणजित' यांचा हरवलेला मोबाईल 'इरफान' ने दिला परत....!



इरफान तांबोळी यांची इमानदारी,मिळालेला मोबाईल केला परत.....


ड्रीम माय हॉलिडे चे प्रोप्रायटर इरफान तांबोळी यांना शनिवारी भाजी मार्केट पनवेल येथे मोट्रोला कंपनीचा महागडा मोबाईल सापडला होता, त्याची चार्जिंग संपली असल्याने ज्या व्यक्तीचा फोन हरवला होता त्याला संपर्क करता येत नव्हता. इरफान तांबोळी यांनी तो मोबाईल ऑफिस मध्ये आणून मोबाईल  चार्जिंग करून चालू केला.त्यात नंबर नसल्याने समोरून कॉल येईल याची वाट पहिली.जेव्हा मोबाईल असणाऱ्या व्यक्तीचं कॉल आला. तेव्हा त्याला सांगितले हा मोबाईल मला सापडला आहे आणि माझ्याकडे आहे काळजी करू नका, तुम्ही येऊन तो घेऊन जाऊ शकता. सदर व्यक्तीला ऑफिस चा पत्ता देऊन मोबाईल घेण्यासाठी बोलावले.
त्यांचे नाव रणजित होते व ते  रेल्वे बँक मध्ये ऑफिसर म्हणून काम करतात.इरफान यांची इमानदारी पाहून त्यांनी बक्षीस देऊ केलेले पैसे इरफान यांनी नाकारले व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुनीर तांबोळी यांच्या उपस्थितीत रणजित यांना मोबाईल परत केला.
आज इरफान यांच्या रूपाने माणुसकीचे दर्शन घडले,रणजित यांनी इरफान यांच्या इमानदारीने कौतुक केले व आज हि माणुसकी जिवंत आहे असे उदगार काढले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें