सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०९जुलै २०१८
कायदा हा माणसाचे जीवन सुखी करण्यासाठी असतो. सर्व समाजातील व्यक्तींनी शिक्षणामधून चांगला माणूस बनले पाहीजे, कायदेशीर मार्गाने जगणारा व्यक्ती यशस्वी होतो. असे मत सोनपेठचे पो.नि. सोपान सिरसाठ यांनी व्यक्त केले. येथील
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ प्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या शिस्त पालन समितीच्या वतीने शिस्त विषयक मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्रमुख पाहूणे सपोनि. अमोल पवार, पत्रकार गणेश पाटील, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्राचार्या शेख शकिला आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी सपोनि अमोल पवार यांनी विविध कायद्यांची माहीती दिली. प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनीही समयोचित मार्गदर्शन केले, अध्यक्षीय समारोप परमेश्वर कदम यांनी केला. प्रास्ताविक प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. आरती बोबडे यांनी कले तर आभार प्रा. सतिश वाघमारे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिस्तपालन समितीचे प्रा. अंगद फाजगे, प्रा. गोविंद वाकणकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सुरेश मोरे, महालिंग मेहत्रे, प्रा. संतोष वडकर, प्रा. रवि धोंडगे, प्रा. सौ. गव्हाणे, प्रा. जीवन भोसले, प्रा. कैलास आरबाड, दत्ता सोनटक्के, चंद्रपाल पटके, संतुक कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें