मराठवाड्यात आंदोलनाची धग कायम; परभणीत दगडफेक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 26 जुलाई 2018

मराठवाड्यात आंदोलनाची धग कायम; परभणीत दगडफेक.


वि.प्रतिनिधी.समशेर खान.
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण मुद्यावरून आंदोलन सुरू आहे. यातच आज सकाळपासून लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू असताना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात काही युवकांनी दगडफेक केली. यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तर सकाळी ७.३० ते १० या वेळेत धर्मापुरी फाट्यावरील रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुक मोर्चानंतर आता ठोक मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चातील आंदोलनकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसला लक्ष्य बनविले होते. आज सकाळी १० वाजता आरक्षण मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरीता सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामीण भागातील मराठा युवकांनी सहभाग नोंदविला होता. परंतु दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या आंदोलनास हिंसक वळण मिळाले. शहरातील जलतरणिका संकुल, स्टेडिअम परिसरातील शासकीय कार्यालये, खासगी दुकानांवर दगडफेकीला सुरूवात झाल्याने व्यापार्यांनी दुकाने बंद केली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. या प्रकाराने परभणीत सर्वत्र तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें