सिल्लोड प्रतिनिधी:शे.कलिम.
सिल्लोड तालुक्यातील विविध प्रकारचे करारनामे,गहाण खत,जमीन खरेदी विक्री,प्लाॅट खरेदी विक्री,इत्यादि दस्त नोंदणी या कार्यालयात केली जाते परंतू या कार्यालयातून सर्वसामान्य लोकांना विनाकारण त्रास दिला जात आहे अशी तक्रार अनेक नागरिकांनी पक्षाकडे केली ज्यात या कार्यालयात जे मालमत्ता धारक दस्त नोंदणी करण्यासाठी येतात त्यांना या कार्यालयातून योग्य व कायदेशीर माहिती दिली जात नाही,कधी दस्त नोंदणीसाठी तोंडी आदेश दिले जाते तर कधी तोंडी च नकार दिला जातो तसेच अनेक नागरिकांना या कार्यालयातून दस्त नोंदणी करण्यासाठी चालान भरण्याचे आदेश दिले जाते चालान भरून घेऊन पुर्ण दस्त तयार करून दस्त नोंदणी करण्यासाठी टोकन सुद्धा दिला जातो खरेदी विक्री करणार्यांकडुन हजारो रुपये चालानच्या स्वरूपात भरून घेतले जातात आणि मग परत त्यांना सांगितले जाते की ही दस्त नोंदणी होणार नाही आणि त्यांना दिशाभूल करणारे खोटे नियम दाखवून त्रास दिला जात आहे असे प्रकरण या कार्यालयात राजरोसपणे घडत आहे हा सर्व त्रास दायक प्रकार सर्वसामान्य लोकांनी पक्षाकडे केला सदर तक्रार बाबत दुय्यम निबंधकाशी चर्चा केली असता व सदर अन्यायकारक प्रकार बंद व्हावा अशी विनंती करूनही दुय्यम निबंधकानी ऊलट उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच नियमांबाबत विचारपूस केली व नियमांची लेखी मागणी केली असता साहेबांनी लेखी देण्यासही असमर्थता दाखवली यावरून असे सिद्ध होते की या कार्यालयात सर्वसामान्य लोकांना विनाकारण त्रास दिला जात आहे,नाहक अडवणुक पिळ वणूक होत आहे खरे म्हणजे तर लोकशाहीत लोकांची अडचण दुर करणे व अडचणीतून बाहेर निघण्यासाठी मार्ग काढणे हे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचे कर्तव्य असते परंतू तसे न करता लोकांच्या कामात अडचण निर्माण करून लोकांवर एक प्रकारचे अन्यायच करीत आहेत अशी पक्षाची मनोधारणा झाली आहे आणि या कार्यालयातून होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी दि. 23/07/2018 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय सिल्लोड समोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी खालील प्रमाणे मागण्या करण्यात आले
1) दस्त नोंदणी विशाअट सुरू करा
2) सर्वसामान्य नागरिकांची अडवणुक बंद करा
3) चालान भरून दस्त सादर केलेल्या दस्तांची नोंदणी त्वरित करा
4) दस्त नोंदणी करण्यासाठी विनाकारण अडवणुक व पिळवणूक बंद करा
5) दस्त नोंदणी करण्यासाठी प्रचलित नियमांची लेखी स्वरुपात माहीती द्या
6) दस्त नोंदणी करण्यामागील त्रुटींची लेखी स्वरुपात माहिती द्या
यावेळी जिल्हा महासचिव प्रभाकर पारधे,ता.अध्यक्ष बनेखा पठाण,ता.उपाध्यक्ष साहेबखा पठाण,शहराध्यक्ष इम्रान उर्फ गूड्डू ,ता.युवाध्यक्ष अनवरखा पठाण,ता.युवा महासचिव शेख रफिक,युवा शहराध्यश फईम पठाण,शहर महासचिव इम्रान पठाण,शेख मूजाहीद,नुरशहा ,शफिकखा रफिकखा पठाण,शेख भिकु,आरेफखा शेरूखा पठाण,शेख अनिस शेख यासीन व अन्यायग्रस्त नागरीक हजर होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें