सिल्लोड प्रतिनिधी.शे.कलिम:२५
सिल्लोड शहराच्या जवळ असलेल्या यशवंत नगर(झोपडपट्टी)येथे अनेक वर्षा पासून नाल्या नसल्याने एका ठिकाणी सांडपाणी तुंबलेले होते त्यामुळे स्थानिक नागरिकांना येजा साठी रस्ताच न्होता तसेच घाणी मुळे दुर्गंधी चे वातावरण निर्माण होत होते व नागीरांच्या आरोग्यला धोका निर्माण झाला होता त्यामुळे स्थानिक नागरिकांनी एम.आई.एम.च्या शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू)यांच्याशी संपर्क साधला.शेख इम्रान यांनी तातडीने त्या ठिकाणी स्वताचे खर्चातून त्या ठिकाणी माती चे ट्रक्टर पाठउन त्या टिकाणी भरती करून तात्त्पुर्ता रस्ता तयार करून दिला त्या मुळे नागरिकांनी त्यांचा अभिनंदन करून समाधान व्यक्त केले या वेळी त्यांच्या सोबत युवा तालुका अध्यक्ष अन्वर पठाण यांची उपस्थिती होती.
यशवंत नगर (झोपडपट्टी) येथे मोठ्या प्रमाणवर नागरिक वास्तव्यास आहे मागील अनेक वर्षा पासून येथे नाल्या बनविल्या गेल्या नाही तसेच इतर सुविधा पासून हि हा भाग वंचित आहे कच-या पासून नाल्या तुडुंब भरल्याने डासांचा प्रदुभाव पण वाढला आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर भयंकर रोग पसरविण्याची शक्यता आहे या वसाहतीत मोठ्या संख्यने लहान मुले हि आहे त्यांना हि घाणी मुळे त्रासाचा सामना करावा लागत आहे नगर परिषदेने वेळीस लक्ष दिले असते तर त्याना ह्या समस्या समोर जाण्यास वेळ आली नसती.या वेळी शेख युसुफ,लतीफ बेग,फहीम बेग,मुसा मिस्तरी,मतीन पठाण,वार्ड अध्यक्ष अश्फाक पठाण,इम्रान पठाण,नासेर पठाण,समीर पठाण,शेख जुनेद,शेख तालेब,अन्नू पटेल,नसीर पटेल आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें