सराटी - बोदवड गावांचा पाणीप्रश्न पावसाळी अधिवेशनात ....! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 जुलाई 2018

सराटी - बोदवड गावांचा पाणीप्रश्न पावसाळी अधिवेशनात ....!


सिल्लोड (प्रतिनिधी)दि  07
       सिल्लोड तालुक्यातील सराटी  - बोदवड गावांचा पाणीप्रश्न पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला असून या गावांतील भिषण पाणी टंचाई प्रश्नावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून काय काय  उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे पाणी पुरवठा मंञी बबनराव लोणीकर यांच्याकडे प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
     उन्हाळ्याची चाहूलही लागत नाही तोच सराटी  - बोदवड या दोन्ही गावांना पाणी टंचाईचा प्रश्न खूपच भेडसावतो. येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ  भटकंती  करावी लागते. या भयावह परिस्थितीवर प्रशासनाकडून काय काय  उपाययोजना करण्यात आल्या आहेत असा प्रश्न पावसाळी अधिवेशनातील पटलावर माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी उपस्थित केला आहे. 
      सराटी  - बोदवड या दोन्ही गावांसाठी सराटी  - बाळापुर पाझर तलावातील सार्वजनिक विहिरींहून पाणी पुरवठा करण्यात येतो.पाझर तलावाच्या खालील बाजुसही दोन्ही गावांसाठी दोन पाणी पुरवठा विहिरी आहेत. या दोन्ही विहिरींहूनही पाणी पुरवठा करायला हवा,पण या विहिरींवरील पाणी पुरवठा पंप - पाणी पुरवठा पाईप लाईन धुळखात पडलेत की चोरीस गेलेत हा प्रश्नही अनुत्तरित आहे.प्रशासनाच्या या धुळखात पडलेल्या मालमत्तेकडे एकप्रकारे दुर्लक्षच करण्यात येत आहे.
       सराटी  - बोदवड या दोन्ही गावांसाठी पाझर तलावातील पाणी पुरवठा विहिरींहून पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी दरवर्षी उन्हाळ्याची चाहूलही लागत नाही तोच या दोन्ही गावांसाठी टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येतो.प्रशासनाकडून या दोन्ही गावांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना मंजूर करावी असी मागणी माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्याकडून करण्यात आली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें