जिंतुर/ निशाद आहेमद
जिंतुर तालुक्याचे माजी आमदार कालवश कुंडलीकराव नागरे यांचे सुपुत्र सुरेश नागरे यांनी बनावट खोटी स्वाक्षरी व जातिवाचक शिविगाळ करुन अपमानित केल्याचा आरोप करुन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार जिंतुर न.प. चे माजी नगरसेवक अशोक (चंद्रा) बहिरट यांनी एका निवेदना मार्फत परभणी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे, या मागणीसाठी येत्या ३० जुलै रोजी जिंतुर मध्ये रास्ता रोको करण्याचा ईशारा ही देण्यात आला आहे.
दाखल केलेल्या तक्रारित म्हटले आहे कि, गत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या वेळी परभणी-हिंगोली मतदार संघातुन निवडणूक लढविन्यासाठी सुरेश नागरे यांनी अशोक बहिरट यांच्या आई जिंतुर न.प.च्या विद्यमान नगरसेविका यांना आपले सूचक असल्याचे दाखवून परभणी- हिंगोली विधानपरिषद मतदार संघातुन अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले होते. आपली आई सुरेश नागरे यांची सूचक असल्याचे अशोक बहिरट यांना मागमुस ही नव्हता, तेंव्हा त्यांनी आपल्या आई सोबत याबाबत विचारणा केली असता, नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी करुन सुचक नसल्याचे सांगितल्यावर अशोक बहिरट याविषयी विचारणा करण्यासाठी सुरेश नागरे यांच्या घरी गेले,त्यावेळी तिथे काही विद्यमान नगरसेवक उपस्थित होते. तेंव्हा अशोक बहिरट यांनी सुरेश नागरे यांना "नामनिर्देशन पत्रावर माझ्या आई सोबत कोणतीही चर्चा न करता बनावट स्वाक्षरी का केली.?" असे विचारले असता, सुरेश नागरे यांनी बहिरट यांना अपमानित करुन जातिवाचक शिविगाळ केली, व त्यांना जीवे मारन्याच्या धमक्या दिल्याचे बहिरट यांनी सांगितले आहे.
या झाल्या प्रकारा बाबत जिंतुर पोलिसां कडून नागरे यांच्यावर रितसर कारवाई साठी तक्रार अर्ज दाखल होऊन ४० दिवस उलटले तरी कारवाई होत नसल्यामुळे बहिरट यांनी परभणी पोलीस अधिक्षकांकडे याबाबत दाद मागितली आहे, याविषयी तात्काळ निर्णय न झाल्यास येत्या ३०जुलै रोजी आण्णाभाऊ साठे चौकात आपल्या समर्थक आणि संघटनांच्या सहयोगाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा ही एका लेखी निवेदना मार्फत देण्यात आला आहे.
सुरेश नागरे हे माजी आमदारांचे सुपुत्र असून त्यांच्याकडे श्रीमंती आणि राजकीय वरदहस्त आहे, मी एक माजी लोकप्रतिनिधी असुनही मला अपमानित करुन धमकीविल्या जाते, तिथे सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील..? मी मागासवर्गीय असल्याने हे प्रकरण दाबून मला सर्वबाजुने डावलण्यात आले आहे. जिंतुर पोलिसांकडून होणाऱ्या विलंबामुळे मला पुढील लोकशाही मार्गाचा अवलंब करुन न्याय मागावा लागत आहे.अशोक [चंद्रा] बहिरट.तक्रारदार, तथा माजी नगरसेवक,न.प. जिंतुर.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें