जिंतूर :- नगर परिषदीच्या वतीने माजी सैनिकांना लागणारे कर माफ करा अशी मागणी जिंतूर नगर परिषद चे गटनेते गोपाळ रोकडे यांनी जिल्हाधिकारी कळे एका लेखी निवेदना दुवारे मागणी केली आहे
माजी सैनिकांना नगर पालीकांच्या वतीने
घर पट्टी,नळ पट्टी,असे कोणतेच कर लावू नाही.असा परिपत्रक 1987 पासून केंद्र सरकारच्या डिफेन्स मिनीस्ट्रीच्या वतीने काढण्यात आला आहे.
परंतु याची अंमलबजावणी होत नाही जिंतूर नगर परिषदेच्या 2016 च्या सर्वसाधारण सभेत माजी सैनिकांना कोणताच कर लावू नाही म्हणून हा विषय न.प. सदस्याच्या सर्वअनुमतीने मंजूर करण्यात आला होता.
परंतु याची अंमलबजावणी होत नाही असे गटनेते गोपाळ रोकडे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन केंद्र सरकारच्या परिपत्रकाची अमलबजावणी करून माजी सैनिकांना कर मुक्त करावे अशी मागणी केली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें