कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि १९ जुलै) मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन पुर्ण झालेल्या पिशोर ते पळशी या रस्त्याचा लोकार्पण सोहळा कन्नड सोयगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते दिमाखात पार पडला।
तसेच माजी आमदार विकास महर्षी स्व. रायभानजी जाधव नगराच्या नामफलकाचा लोकार्पण देखील आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला।
यावेळी उपस्थितीत कन्नड पंचायत समिति सभापती मीनाताई मोकासे, कन्नड बाजार समिती संचालक जयेश बोरसे, माजी सरपंच बापु मोकासे, गणेश ठोकळ, बांधकाम विभागाचे अभियंता, सिंचन विभागाचे अभियंता आदिंसह पंचक्रोशीतिल ग्रामस्थ व नागरिकांची उपस्थिति होती।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें