माझी शाळा माझी टेकडी उपक्रमांतर्गत झाडे लागवड
भोकरदन(प्रतिनिधी)
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्ष हे नात्या पेक्षा श्रेष्ठ आहेत असे संत तुकारामांनी अभंगात यापूर्वी सांगितले आहे वृक्षाचे महत्त्व मानवी जीवनापेक्षा अनन्य साधारण आहे.असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर यांनी केले
त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखून ठेवण्याकरिता महाराष्ट्र शासनाने 13 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे
याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील 318 शाळांमध्ये 25 हजार झाडे लावण्यात आली एक मुलं एक झाड हा उपक्रम प्रभावीरित्या राबण्यात येत आहे
नोंदणीनुसार अक्षाउंस रेखांश वृक्षरोपण नोंद करण्यात येत आहे
माझी शाळा माझी टेकडी उपक्रमांतर्गत भोकरदन तालुक्यातील विझोरा ते वाढोणा मध्ये असलेल्या भुयारेश्वर या मंदिराच्या परिसरातील असलेल्या टेकडीवर एक हजार झाडे लावण्यात आली आहे
सदर उपक्रमासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी भोकरदन सामाजिक वनीकरण विभाग भोकरदन यांनी ही रोपे उपलब्ध करून दिली
आहे
तर लागवड करण्यासाठी प्राथमिक शाळा वाढोणा तसेच विझोरा शाळेने हा उपक्रम भुयारेश्वर मंदिर परिसरात आयोजित केला होता
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भोकरदन येथील गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ सहाय्यक विजय सोनवणे तसेच केंद्रप्रमुख भिमराव बडगे हे होते
पुढे बोलताना शहागडकर म्हणाले की रोपे लागवड करून भागणार नाही तर त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. त्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावी दर पंधरा दिवसाला त्या झाडांना पाणी टाकून त्याची किती उंची वाढली याची नोंद घ्यावी असे आवाहन गटशिक्षण अधिकारी दिलीप शहागडकर यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी पंचायत समिती सदस्य तथा भुयारेश्वर विद्यालयाचे गणेश ईगळे व सरपंच विझोरा तसेच वाढोणा आणि ग्रामसेवक श्री वाघ गवई.
विझोराचे मुख्याध्यापक मुरकुटे सर वाढोणाचे मुख्याध्यापक वानखेडे सर केंद्रीय मुख्याध्यापक ताठे सर मा. केंद्रप्रमुख सपकाळे सर .धावडा प्रशालाचे मुख्याध्यापक डी एम बडगे सर जयदेववाडी मुख्याध्यापक लोखंडे सर समतानगरचे मुख्याध्यापक गोलाईत सर यांच्यासह सर्व विद्यार्थी व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें