सोनपेठ(राजेश खेडकर) दि. ३१जुलै २०१८
सोनपेठ शहरातील मारवाडी बालाजी मंदिर येथे दि.२९ जुलै २०१८ रविवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता सोनपेठ रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी रो.हरिष मोटवाणी (प्रांतपाल 2020-2021), रो.सौ.मोटवानी, रो.जनार्धन राव (डायरेक्टर डिस्ट्रिक काॕड्रिनेटर) प्रमख पाहुणे रो.महेंद्र खंडागळे (सहाय्यक समन्वयक उपप्रांतपाल), रो.माधव वलसे (उपप्रांतपाल), रो.संजय घुले (डायरेक्टर क्लब विस्तार), माजी अध्यक्ष रो.बालमुंकुद सारडा, माजी सचिव रो.संजय आढे, नूतन अध्यक्ष रो.प्रदीप गायकवाड व नूतन सचिव रो.इंजि.चंद्रकांत लोमटे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संजय देशमख यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, सर्व उपस्थित रोटरीयन यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नूतन रोटरीयन प्रा.डॉ.बबन पवार, प्रा.डॉ.मुंजाभाऊ धोंडगे, महेश शर्मा, डॉ.सुभाष पवार, सुभाषअप्पा नित्रुडकर, शैलेश महाजन, लिंबाजी कागदे, जयसिंगराव देशमुख आदींचे स्वागत पाहुण्यांच्या हस्ते रोटरी पीन लाऊन करण्यात आले, कार्यक्रमास माजी आ.व्यंकटराव कदम, रमाकांत जहागीरदार, प्राचार्य दुकळे व पत्रकार बांधवांची विशेष उपस्थिती होती.
माजी अध्यक्ष रो.बालमुंकुद सारडा यांनी मागीलवर्षीचे अहवाल वाचन करून मनोगत व्यक्त केले. पाणी फाऊडेंशन स्पर्धेत सहभागी झालेल्या उजनी ता.अंबाजोगाईचे सरपंच भारत गायकवाड यांचे स्वागत करून रोटरी क्लबच्या वतीने ३०००/-रुपयांची मदत करण्यात आली.
सर्व प्रमुख अथिती व पाहुण्यां च्या मनोगता नंतर नूतन अध्यक्ष व सचिवांचा सत्कार अॅड.नेताजी काळे व गोविंदराव शिंदे यांनी फेटा बाधुन केला,
अप्रतिम असे सुत्रसंचालन संदिप लष्करे व रो.प्रा.अनंत जाधव यांनी केले. समारोप राष्ट्रगीताने करुन उजनी ग्रामस्थांनी सुरूची भोजनाचे आयोजन केेेले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा कुसुमकर, शहरातील प्रतिष्ठित नागरीक, व्यापारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षीका, सामाजिक कार्यकर्ते व रोटरीयन परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें