भोकरदन येथील विज वितरण कार्यालयातील प्रकार.
भोकरदन (प्रतिनिधी ) येथील वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सुमीत बरडे यांची साडे तीन वर्षाची मुलगी ही जन्मताच "थॅलेसेमिया "या आजाराने ग्रस्त असून या मुलीला दर तीन महिन्याला एक बॅग रक्त द्यावे लागते. व ते सुमित बरडे यांना परवडत नसल्याने येथील उप कार्यकारी अभियंता श्री. ओहोळ यांनी सर्व कर्मचाऱ्यांना रक्तदाना बाबत सल्ला दिला. अन तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांनी होकार दिला. व जवळपास 60 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्याची आदर्शवत घटना भोकरदन येथे घडली.
भोकरदन येथील वीज वितरण कार्यालयातील कर्मचारी सुमित बरडे यांची श्रद्धा बरडे ही साडेतीन वर्षांची मुलगी. तिला जन्मताच "थॅलेसेमिया " या आजाराने ग्रासले आहे. तिला दर महिन्याला एक बॅग रक्त द्यावे लागते. श्री. बरडे यांना दवाखान्याचा हा खर्च परवडत नसल्याने ते परेशान होते. ही बाब येथील वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता श्री. ओहोळ यांच्या लक्षात आली. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या ही लक्षात आणून दिले आणि सर्वांना च गळ घातली व रक्तदाना बाबत सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें