मराठा संघटनांकडून आज महाराष्ट्र बंदची हाक. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 जुलाई 2018

मराठा संघटनांकडून आज महाराष्ट्र बंदची हाक.


राज्यातील मराठा संघटनांकडून मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. औरंगाबाद मध्ये सोमवारी काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चातील काकासाहेब शिंदे या तरूणाने आंदोलना दरम्यान गोदावरीच्या पात्रात उडी मारली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांकडून हा निर्णय घेण्यात आला.

मराठा संघटनांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने परिस्थिती आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्र बंद राहील, असा निर्धार मराठा संघटनांनी केला आहे. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, ही मागणीही मराठा संघटनांकडून लावून धरली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी याविषयी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें