पूर्णेचे गटशिक्षण अधिकारी व शिक्षण सम्राटाच्या मनमानी कारभराविरोधात पूर्णेतील तरुणाई उतरणार रस्त्यावर. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 जुलाई 2018

पूर्णेचे गटशिक्षण अधिकारी व शिक्षण सम्राटाच्या मनमानी कारभराविरोधात पूर्णेतील तरुणाई उतरणार रस्त्यावर.


पालम/अनीस खुरेशी

 पूर्णा तालुक्यात सर्व शिक्षा अभियानाचा बोजवारा उडाला असून एकीकडे सरकार गोर गरिबांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा करीत आहे.शासना मार्फत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप व मोफत संगणक प्रशिक्षण व विद्यार्थी शाळेमध्ये दररोज जावे यासाठी मोफत शालेय पोषण आहार योजनाही शासनाने सुरु केली आहे परंतु पूर्णा तालुका व शहरात गटशिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे हे शैक्षणिक क्षेत्रात लक्ष न देता भाषणबाजी करण्यातच मग्न असल्याने पूर्णेत शासनाची एकही योजना विद्यार्थ्यांपर्यंत अद्यापही पोलचाली नाही.अनेकवेळा खाजगी शैक्षणिक संस्थेची माहिती मागितली असतांना हि माहिती आमच्याकडे उपलब्ध नसते व आम्हाला याचा अधिकार नाही तेंव्हा तुम्ही जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करा गट शिक्षण अधिकारी सांगतात.
   या सर्व प्रकाराला त्रस्त होऊन व मनमानी कारभाराच्या विरोधात पूर्णेतील सामाजिक कार्यकर्ते स.अतिक,नागेश एंगडे, मो.शफीक यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी परभणी यांना पूर्णेचे गटशिक्षण अधिकारी उपजिल्हा शिक्षणधिकारी विठ्ठल भुसारे यांची परभणी जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी व पूर्णेतील अभिनव विद्या विहार 1ली प्रवेशासाठी 1000 ते 1500 रुपये पालकांकडून घेतले जात आहेत.तेंव्हा या शाळेची चौकशी करण्यात यावी.पूर्णा तालुक्यात व शहरात शालेय पोषण आहार जात आहे.मेन्यूप्रमाणे दिले जात नसून विद्यार्थ्यांना फक्त निकृष्ट दर्जाची खिचडी देवून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आनले जात आहे.
   त्यामुळे आत्तापर्यंत शालेय पोषण आहार योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून खाजगी शिक्षण संस्थेच्या तपासण्या करण्यात यावा व मोफत गणवेश वाटप योजना हि कागदोपत्रीच आहे.विद्यार्थ्यांना एकही शाळा मोफत गणवेश देत नाही. त्यामुळे या योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी.अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा शिक्षणाधिकारी परभणी यांना सामाजिक कार्यकर्ते स.अतिक,नागेश एंगडे,मो.शफीक यांनी दिनांक 06जून 2018 रोजी निवेदन दिले.
  जर या मागण्या आठ दिवसात मान्य न झाल्यास विविध सामाजिक संघटनेच्या व नागरिकांच्या वतीने दि.23 जुलै रोजी पूर्णा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें