सेलू प्रतिनिधी
तालुक्यातील बोगस बियाणे दिलेल्या दुकानदारावर कृषी विभागाकडून कार्यवाही करून संबंधित कृषी दुकानदाराचा परवाना रद्द करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी ज्ञानेश्वर माऊली उत्तम राव भाबट यांनी एका निवेदनात 2 जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेतामध्ये लागवडीसाठी 17 एप्रिल 2018 रोजी सेलू येथील धरती धन या दुकानदाराकडून दोडक्याचे दोन पाकीट लागवडीसाठी घेऊन गेल्यानंतर सदरील दोडक्याच्या वेलची वाट पूर्ण झाली पण वेलाला एकही फळ लागली नसल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर सदरील आर्या( अजीत सिड्स) कंपनीचे बियाणे वांझ निघाल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे त्यामुळे संबंधित बियाणी विक्रेत्यावर त्याच्या दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करावा आणि शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी आठ दिवसाच्या आत जर नुकसान भरपाई देण्यात आली नाही तर संबंधित कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे यावेळी ज्ञानेश्वर माऊली उत्तमराव भाबट यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें