रवळगावात मोटारीचे बटन सुरू करताना शाॅक लागून युवकाचा मृत्यू . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

रवळगावात मोटारीचे बटन सुरू करताना शाॅक लागून युवकाचा मृत्यू .




सेलू! प्रतिनिधी

 सेलू तालुक्यातील रवळगाव येथील एका युवकाने सकाळी लोड शेडिंग असल्यामुळे शेतात लवकर जाऊन पिकासाठी पाणी देण्यासाठी शेतातील विहिरीत असलेल्या मोटारीचे बटन  सुरू  करण्यासाठी गेला असता विजेचा शॉक लागून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार २७ जुलै रोजी सकाळी साडेसात  घडली. याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील  रवळगाव येथील
 अतुल रामेश्वर सपाटे वय १७ वर्षे हा युवक दररोज लोडसेंडीग होतमुळे पिकाला पाणी देण्यासाठी  सकाळी साडेसात वाजता शेतात  गेला असता विहिरीवरील मोटारीचे बटनसुरू करत   असतांना  विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.  अतुल सपाटे  हा  घरी परत न आल्यामुळे त्याला पाहण्यासाठी  आकरा  वाजता हरिभाऊ सपाटे, लक्ष्मण सपाटे  शेतात  गेले. विहिरीजवळ मोटर सुरू करण्या साठी गेला असता  स्टार्टरचे बटन दाबतांना  शॉक लागून  त्याचा मृत्यू झाला. याघटनेची  सेलू पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या  घटनेमुळे रवळगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत  आहे. त्याच्या पश्चात दोन भाऊ वडील असा परिवार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें