परभणी जिल्हा वृतपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरहरी लिंगायत यांचा सन्मान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

परभणी जिल्हा वृतपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरहरी लिंगायत यांचा सन्मान.



सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२८जुलै २०१८

परभणी जिल्हा वृतपत्र विक्रेता संघटनेचे  जिल्हाध्यक्ष नरहरी लिंगायत यांनी शनिवार दि. २८ जुलै रोजी सोनपेठ येथील सर्व पदाधिकारी सदस्य यांची सदिच्छा  भेट घेतली. या वेळी तालुका संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले, या प्रसंगी त्यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन करून वृत्तपत्र वितरण व संघटनेच्या अडी अडचणींवर चर्चा केली.
संघटनेचे मार्गदर्शक शिवमल्हार वाघे यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले. या वेळी तालुका अध्यक्ष रामेश्वर पोटे, संघटनेचे ज्येष्ठ विद्यासागर बागडे, संघटनेचे उपाध्यक्ष माधवराव जगताप, गजानन चिकणे, डिगंबर गाजरे,  परमेश्वर जाधव, सुहास बागडे, शिवाजी कुंभारीकर, वसंत मस्के, सुमित बागडे आदी उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें