नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न;
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.११ ) -
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत वृक्षसंवर्धन करणे ही एक लोक चळवळ बनली पाहिजे असे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी वृक्षरोपन प्रसंगी व्यक्त केले.
सिल्लोड शहरातील बालाजी नगर मधील स्वामी समर्थ सेवा केंद्र परिसरात नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने पावसाचे प्रमाण खुपच कमी होत आहे पर्यावरणाचा होत असलेला -हास आणि जागतिक तापमानवाढीवर उपाय हा केवळ मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज असुन वृक्षसंवर्धन ही एक लोक चळवळ उभी करण्याची गरज असल्याचे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक कायंदे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, महंत खडकुलीकर बाबा, सुधाकर मापारी, अशोक राका, अमित आरके, मिर्झा सांडूबेग, रुपेश कुलकर्णी, राजू साठे, प्रविण सोनवणे, मधुकर बेंडाळे, सुभाष राठोड, चंदन बाबा, मनोहर आरके, राजेश्वर आरके, रवि ठाकूर, फईम पठाण, रवि ठाकूर, मरकड मंगरुळकर आदिंसह पदाधिकारी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें