शिर्डी प्रतिनिधी (राजेंद्र दुनबळे).
शिर्डी. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांची सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या शुभहस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा करण्यात आली.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. या निमित्ताने श्री साईबाबांच्या प्रतिमेची व पोथीची व्दारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम व विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांनी प्रतिमा, विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांनी विणा व विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके यांनी पोथी घेवून सहभाग घेतला. यावेळी अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त अॅड.मोहन जयकर, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, सौ.नलिनी हावरे, सौ.सरस्वती वाकचौरे, सौ.स्मिता जयकर, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्याचे गृह (ग्रामिण) वित्त व नियोजन मंत्री दिपक केसरकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
सकाळी श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्त संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांची सुविद्य पत्नी सौ.नलिनी हावरे यांच्या हस्ते लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्हे, अॅड.मोहन जयकर, विश्वस्त तथा नगराध्यक्षा सौ.योगिताताई शेळके, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, सौ.सरस्वती वाकचौरे, सौ.स्मिता जयकर आदि मान्यवर उपस्थित होते.
दुपारी ०४.०० ते सायं. ०६.०० यावेळेत ह.भ.प.श्री.चारुदत्त गोविंदस्वामी यांचे कीर्तन झाले. सायं.५.०० वाजता श्रींच्या रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत साईभक्त, ग्रामस्थ आणि बँड पथके मोठ्या संख्येने सहभागी झाले. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती झाली. रात्रौ ०७.३० ते १०.३० यावेळेत पंडीत हरिप्रसाद चौरसिया, मुंबई व पंडीत विजय घाटे, पुणे यांचा बासरी वादन कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला. या कार्यक्रमास श्रोत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे ०४.०० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०६.३० वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून सकाळी १०.३० वाजता ह.भ.प.श्री.चारुदत्त गोविंदस्वामी यांचा काल्याच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्रौ ०७.३० ते ०९.०० यावेळेत श्री.सुधांशु लोकेगांवकर, शिर्डी यांचा साईभजन कार्यक्रम, रात्रौ ०९.०० ते ०९.४५ यावेळेत श्री.अंचल शर्मा, रायपूर यांचा साई भजन कार्यक्रम व रात्रौ ०९.४५ ते ११.०० यावेळेत श्री.मदन चौहान, रायपूर यांचा साई भजन कार्यक्रम हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार आहे. तसेच श्रींच्या दर्शनासाठी समाधी मंदिर रात्रभर उघडे राहाणार े. तर रात्रौ ११.०० ते पहाटे ०५.०० यावेळेत समाधी मंदिरासमोरील स्टेजवर कलाकारांच्या हजेरीचा झाला

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें