तालुक्यातील मंहिद्रा फायनान्स कडून कर्जवसुलीसाठी होत असलेल्या घरजप्तीच्या कारवाईस शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करुन घरजप्तीची कारवाई थांबवली .
सोनपेठ तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी महिंद्रा फायनान्स या खाजगी कंपनीच्या वतीने घर बांधणीसाठी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी फायनान्स कंपनीने घरजप्तीची कारवाई सुरु केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता. दि ११ रोजी करम येथील भगवान हुंबे यांच्यावरील थकीत कर्जासाठी कंपनीचे अधिकारी घरजप्तीची कारवाई करण्यासाठी शासकीय अधिकारी व पोलीस यांना घेऊन गावात जात असतांनाच स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावाच्या फाट्यावर त्यांना अडवुन जप्तीची कारवाई रद्द करण्याची मागणी केली. ऐन पावसाळ्यात व पेरणीच्या दिवसात घरजप्ती करु नये अशी विनंतीही यावेळी यांच्यावतीने करण्यात आली.
या वेळी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभाग प्रमुख सुधीर बिंदु, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे भगवान शिंदे, माऊली लंगोटे यांच्या सह स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जप्तीसाठी महिंद्रा फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी शिवाजी कराड, ग्रामसेवक, तलाठी पोलीस जमादार अळनुरे, जनार्धन दहिफळे, महिला पोलीस जयश्री मुंडे यांनी बंदोबस्त ठेवला. या वेळी मंहिद्रा फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला कर्जपरत फेड करण्यासाठी मुदत देऊन घरजप्ती पुढे ढकलली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें