येथील वाचन संस्कृती जोपासन्यासाठी प्रयत्न करित असलेल्या ग्रंथ वाचन चळवळीपासून प्रेरणा घेत कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी वाढदिवसानिमित्त ग्रंथभेट देण्याची परंपरा सुरू केली आहे. यामुळे वाचन करण्याची परंपरा निर्माण होत असुन ग्रंथ भेटीमुळे वाचन संस्कृती वाढीस लागत आहे असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी केले.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात प्रदीप गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास पुस्तके भेट दिली, यावेळी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे होते. यावेळी पुढे बोलताना गायकवाड यांनी महाविद्यालय सोनपेठ शहराला शैक्षणिक व संस्कृतीक ओळख निर्माण करून देत असून; अभ्यासू व चांगला विद्यार्थी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असे उद्गार काढले. ग्रंथभेटीमुळे अभ्यासाची परंपरा निर्माण होते असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. मारोती कच्छवे, प्रा. डॉ. बालासाहेब काळे, प्रा. डॉ. मुंकुदराज पाटील, प्रा. विकास रागोले, प्रा. महालिंग मेहत्रे, प्रा. डॉ. बापुराव आंधळे, सहशिक्षक राठोड, सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रा. डॉ. अशोक चव्हाण, गोपीनाथ गिराम, भागवत हाके, संतुक परळकर, संतुक कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. ग्रंथपाल अनंत सरकाळे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयास ग्रंथभेट दिल्याबद्दल प्रदीप गायकवाड यांचे आभार व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें