विवेकानंद विद्यालयात' प्रथम गुरु 'पूजनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 जुलाई 2018

विवेकानंद विद्यालयात' प्रथम गुरु 'पूजनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.


सेलू / प्रतिनिधी
भा. शि.प्र. संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयात दि.२७ जुलै शुक्रवार रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त ' प्रथम गुरु ' पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. पालकांना विद्यालयात बोलवून त्यांचे पाल्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी स्थानिक कार्यवाह किरणराव डुघरेकर ,प्रमुख वक्ते तथा प्रसिद्ध कीर्तनकार श्री.योगेश महाराज साळेगावकर ,मु.अ. बळवंत देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना योगेश महाराज म्हणाले की, आई - वडील हे आपले प्रथम गुरु आहेत नंतर शिक्षक हे आपले गुरु आहेत. विद्यार्थ्यांनी विद्या प्राप्त करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा वी. विद्यार्थी हा ज्ञानपिपासू असावा. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी अपेक्षित यश गाठू शकतो. या आगळ्या- वेगळ्या कार्यक्रमाचे कौतुक त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात श्री.डूघरेकर यांनी आई- वडिलांना ,आई - बाबा अशीच हाक मारावी असे आवाहन केले.यावेळी उपस्थित पालकांचे पूजन करण्यात आले.
सूत्रसंचालन विजय चौधरी ,प्रास्ताविक मु.अ. बळवंत देशमुख,पद्य विद्यार्थ्यांनी सादर केले.   आभार दीपाली भावसार यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन साळवे, शंकर राऊत , विनोद मंडलिक ,सतीश भुजबळ, काशिनाथ पांचाळ ,श्रीपाद जोशी, चंदू कव्हळे, चक्रधर वाघमारे, अभिषेक राजूरकर, रागिणी जकाते , मनीषा धर्माधिकारी ,संध्या शोभने , दीपाली पवार , अश्विनी धामणगावकर ,नेत्रा ढाले ,सेवक दत्ता गिरी यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें