सेलूत उद्या चक्का जाम आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 27 जुलाई 2018

सेलूत उद्या चक्का जाम आंदोलन.



सेलू प्रतिनिधी
सेलू :- मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या परभणी शहरातील आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला व मराठा आंदोलकावर अमानुष लाठीमार केला. या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची तात्काळ बदली करून मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासाठी जिल्हाभरात चक्का जाम आंदोलनाची हाक दिलेली असुन त्याअंनुषगाने उद्या दि. 28 जुलै शनिवार रोजी सकाळी दहा वाजता शहरातील रायगड काॅर्नर येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चा कडून सांगण्यात आले.
तसेच या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शिक्षक, महिला भगींनी,लोकप्रतिनिधी आदींनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें