देऊळगाव ते लाडनांद्रा रस्त्यासाठी शिवसेना व ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश.सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 जुलाई 2018

देऊळगाव ते लाडनांद्रा रस्त्यासाठी शिवसेना व ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश.सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन.


येत्या दोन दिवसात रस्त्याचे खड्डे बुजून निविदा प्रक्रिया करून डांबरीकरणाचे काम हाती घेणार.


सेलू प्रतिनीधी
तालुक्यातील देऊळगाव ते लाडनांद्रा रस्ता  अत्यंत खराब झाल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असे मात्र सा बा विभागाला वेळो वेळी सूचना देऊनही अधिकारी व कर्मचारी हलगर्जीपणा करत होते म्हणून शिवसेना व ग्रामस्थांनी 2 जुलै रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा दिला होता त्या नुसार देऊळगाव फाट्यावर आंदोलनास सुरुवात करण्यात आली होती यावेळी  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल घेत येत्या दोन दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजून देण्यात येणार आहेत व या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रक्रिया करून डांबरीकरण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्याने शिवसेना व ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देउळगाव मार्गे राधे धामणगाव,खवणे पिंप्री, डासाळा लाडनांद्रा आदी गावांना जाणारा रस्ता आहे मात्र मागील अनेक दिवसांपासून या रस्त्यावर मोठं मोठी खड्डे पडल्याने वाहन धारकास कसरत करत वाहने चालावे लागत आहे यामुळे सर्वसामान्य जनतेला मानेचा कंबरेचा त्रास जाणवत आहे तसेच खड्डे चुकविण्याचा नादात अनेक जणांचे अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत अनेक जण जखमी होऊन कायमचे अपंगत्व आले आहे त्याच बरोबर गरोदर महिलांची खराब  रस्त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत यातच कित्येक महिला रस्त्यातच प्रसूत झाल्याचा घटना घडल्या आहेत परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना याचे काही सोयर सुतक राहिले नसल्याने वेळो वेळी सूचना निवेदन देऊनही कोणतीही दखल घेतली नसल्याने शिवसेना विधानसभा प्रमुख तथा गट नेते राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांसोबत रस्ता रोको आंदोलन 2 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सुरु करण्यात आले यावेळी सा बा विभागाचे उपअभियंता कोरे यांनी लेखी आश्वासन देण्यात आले यात देऊळगाव गात ते डासाळा या रस्त्यासाठी मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी  स न 2018 - 19 च्या अर्थसंकल्पात 2.54 कोटी निधी मंजूर झालेला आहे व या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम हाती घेणार आहेत तसेच डासाळा ते लाडनांद्रा या रस्त्याच्या कामासाठी 5 ते 7 कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार असल्याचे यावेळी तोंडी सांगण्यात आले
व येत्या दोन ते तीन दिवसात खड्डे बुजण्याचे काम हाती घेणार असल्याचे सांगीतले असल्याने रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी ग्रामस्थ व शिवसेनेच्या आंदोलनाला यश आल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे या आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख रणजीत गजमल,आप्पासाहेब डख,चंद्रकांत कदम, व्यंकटराव चव्हाण, गोपाळ कदम,सुभाष गायकवाड,जिवन चव्हाण,प्रल्हाद गोरे,अतुल डख,भुजंगराव खरुसने,आबा खरुसने,मधुकर कव्हळे,चंदू कदम,सतीश शेलार,सुधाकर साखरे,नारायण गजमल,जगन पवार,राजेभाऊ गोरे,गजानन साखरे,भुजंग जाधव,दत्तराव कदम,शिवाजी कदम,शिधू मगर आदी ग्रामस्थ व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थीत होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक काशीकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें