अफवानवर विश्वास ठेवू नये शिर्डी पोलिसांनकडून जाहिर आवाहन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 2 जुलाई 2018

अफवानवर विश्वास ठेवू नये शिर्डी पोलिसांनकडून जाहिर आवाहन.


शिर्डी पोलिसांनकडून जाहीर आवाहन

 शिर्डी (प्रतिनिधी) राजेंद्र दूनबळे.
शिर्डी  ( प्रतिनिधी ) सर्व जनतेस सूचित करण्यात येते की, मागील काही दिवसापासून काही समाजकंटक  व्हाट्स अॅप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत. अशा अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत तर काही घटनांत खून झाले आहेत. त्यातून अशा जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या धुळे,नंदुरबार,जळगांव, नाशिक  जिल्ह्यातही अशा अफवा पसरविल्या जात असून लोकात भीती  पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे.
 त्यामुळे अनेक घटना समोर येत आहे
 जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, अफवांवर  विश्वास ठेऊ नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मिडियातून आलेल्या मॅसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अफवेला बळी पडून आपल्या हातून गंभीर गुन्हा घडल्यास संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी स्वतःहून कायदा हातात घेऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन  शिर्डी पोलिसस्टेशनचे  पोलीस निरीक्षक  माने साहेब यांच्या वतीने करण्यात आले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें