भोकरदन बंदला समिश्र प्रतिसाद, व्यापाऱ्यांनीही ठेवले दुकाने बंद ! काकासाहेब शिंदे यांना क्रांती मोर्चाच्या वतीने वाहीली श्रद्धाजंली . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 जुलाई 2018

भोकरदन बंदला समिश्र प्रतिसाद, व्यापाऱ्यांनीही ठेवले दुकाने बंद ! काकासाहेब शिंदे यांना क्रांती मोर्चाच्या वतीने वाहीली श्रद्धाजंली .




शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : मराठा  क्रांतीच्या वतीने  पुकारण्यात  आलेल्या  बंदला  भोकरदनला उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला.  भोकरदन  शहरात  कडकडीत बंद पाळण्यात आला.
दरम्यान  दिनांक  24 मंगळवार  रोजी  सकाळी  10:00 वाजता  शिवाजी  महाराज  यांच्या  पुतळ्या समोर  शेकडो  मराठा  बांधवांच्या उपस्थित  गंगापूर  तालुक्यातील कायगाव येथे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व इतर मागणीसाठी सुरु असलेल्या 'जलसमाधी आंदोलनात मृत्यू झालेल्या काकासाहेब दत्तात्रे शिंदे यांना श्रद्धाजंली वाहण्यात  आली  . " काकासाहेब  शिंदे  अमर  रहे  अमर " रहेच्या घोषणाबाजी करत  संपूर्ण  शहर  दुमदुमून  गेले  होते  ,  शिवाजी  महाराज  चौकातून आंदोलनास  सुरवात  झाली.  पायी  रॅलीतुन समाज  बांधवांनी  नागरिकांनी बंदची  हक  दिली.  रॅली आंबेडकर  चौक,  महात्मा फुले  चौक  , सोनार  गल्ली, जाफराबाद  रोड  ते  पंचायत  समिती  पर्यंत काकासाहेब  शिंदे  अमर  रहे  अमर  रहे  अशा  घोषणा  देत  रॅलीचा शिवाजी  महाराजांच्या  चौकात  समारोप  करण्यात  आली  .
दरम्यान  उद्या  दिनांक  25 रोजी  उपविभागीय  अधिकारी  यांच्या  कार्यालया समोर  धरणे  आंदोलन  करण्यात  येणार  आहे  ,  तसेच  दिनांक  26 रोजी  चक्का जाम  आंदोलन  करण्यात  येणार  आहे  तरी  तालुक्यातील  सर्व  मराठा  समाज  बांधवांनी  उपस्थित  राहण्याचे  आवाहन देखील   सकल  मराठा  क्रांति मोर्चाच्या  वतीने  करण्यात  आले  आहे. यावेळी  राहुल  देशमुख,  प्रा. नंदकुमार  गिर्‍हे,  रामदास  रोडे,  केशव  जंजाळ, प्रा. अंकुश  जाधव,  विनोद  मिरकर ,  दिपक  मोरे,  दिपक  जाधव  ,  सुरेश  तळेकर, रामेश्वर  जंजाळ,  बबन  जैवळ , सतिश  रोकडे, रावसाहेब  कोरडे,  नारायण  लोखंडे, नानासाहेब  वानखेडे,  विष्णू  गाढे  , नारायण लोखंडे,दीपक जाधव, आप्पासाहेब  जाधव  यांच्या  सह  शेकडो सकल  मराठा  क्रांती  मोर्चाचे पदाधिकारी  व  समाज  बांधव  मोठ्या  संख्येने  सहभागी  झाले  होते,
नंतर   दुपार पर्यंत  मराठा  युवकांनी व्यापाऱ्यांनी दुकाने  बंद  ठेवण्यासाठी  मोटारसायकल  वर  फिरत  या  बंदला  भोकरदन  करांनी उत्स्फूर्तप्रतिसाद दिला.  यावेळी  लोक  प्रतिनिधीच्या विरोधात  प्रचंड  घोषणाबाजी  केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें