मराठा आरक्षण प्रश्नी सोनपेठ बंद यशस्वी.आरक्षणाचा मुद्दा मार्गी लाऊन मगच मेगा भरती करण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 जुलाई 2018

मराठा आरक्षण प्रश्नी सोनपेठ बंद यशस्वी.आरक्षणाचा मुद्दा मार्गी लाऊन मगच मेगा भरती करण्याची मागणी.



सोनपेठ(राजेश खेडकर) दि. २४जुलै २०१८

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरून काकासाहेब शिंदे या तरुणाने सोमवारी औरंगाबाद येथे घेतलेल्या जल समाधीच्या पार्श्वभूमीवर आज सरकार विरोधात पुकारलेल्या सोनपेठ बंदला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवाजी चौकात काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात येऊन आंदोलनाची सुरूवात करण्यात आली. शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली होती. बंद दरम्यान जमाकडून शिवाजी चौकात अग्नी शमन बंबाच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या व रस्त्यावर टायर जाळण्यात आले.
काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजी नगर जिल्ह्यात गोदावरी नदी पात्रात उडी मारून जलसमाधी घेतली होती. या आत्महत्येला सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप करत सरकारच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवून बंद पाळला तर सकाळपासूनच शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच बाजारपेठ बंद होती. बसेस बंद असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस प्रशासनाच्यावतीने जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तसेच आंदोलकांनी ही जमावाला शांत राहण्यास सांगितले. सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शहीद काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी राजीनामा द्यावा तसेच शासनाने मेगा भरती स्थगित करावी व मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी काढून मेगा भरती चालू करावी आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. एकंदरीत किरकोळ प्रसंग वगळता बंद यशस्वी ठरला. यावेळी चौका चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें