मुस्लीम आरक्षणाचं काय? इम्तियाज जलील यांचा सवाल ज्या समाजाचं प्रतिनिधित्व जास्त त्याच समाजाचा आवाज इथे उठवला जातो, हे दुर्दैवी आहे, असंही इम्तियाज जलील म्हणाले. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

मुस्लीम आरक्षणाचं काय? इम्तियाज जलील यांचा सवाल ज्या समाजाचं प्रतिनिधित्व जास्त त्याच समाजाचा आवाज इथे उठवला जातो, हे दुर्दैवी आहे, असंही इम्तियाज जलील म्हणाले.



मुस्लूम आरक्षणाचं काय? इम्तियाज जलील यांचा सवाल
मुंबई : मराठा आमदार जास्त आहेत म्हणून तुम्ही आरक्षण मागता. धनगर आमदार आहेत ते आरक्षण मागतात. मग मुस्लीम आरक्षणाचं काय, असा सवाल एमआयएमचे आमदार इम्जियाज जलील यांनी केला आहे.

मुस्लीम आरक्षण कोर्टात टिकलं होतं, मग मुस्लीम आमदार नाही म्हणून हा मुद्दा कोणी उपस्थित करणार नाही का? सगळेच जण आपल्या समाजासाठी आरक्षणाची मागणी करणार, मग ओपन प्रवर्गाबाबत काय? त्यांचा कोण विचार करणार? असा सवालही जलील यांनी उपस्थित केला.

हे दुर्दैवी आहे की ज्या समाजाचं प्रतिनिधित्व जास्त त्याच समाजाचा आवाज इथे उठवला जातो, असंही जलील म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत तोडग्यासाठी विधानभवनात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला इम्तियाज जलील यांचीही उपस्थिती होती. बैठकीत मराठा आमदार जास्त असल्यामुळे आरक्षण मागत आहेत, पण मुस्लीम आरक्षणाचं काय, असा सवाल त्यांनी बैठकीनंतर केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें