पिक विमा प्रकरणी कडकडीत बंद नंतर आजचे चक्काजाम आंदोलनही यशस्वी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 जुलाई 2018

पिक विमा प्रकरणी कडकडीत बंद नंतर आजचे चक्काजाम आंदोलनही यशस्वी.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि. ०६जुलै २०१८ बहुचर्चित रिलायंस पिक विमा प्रकरणी आयोजित कालच्या सोनपेठ बंद आंदोलनास मिळालेल्या शंभर टक्के यशानंतर आजचे चक्काजाम आंदोलनही शांततेत व यशस्वीपणे पार पडले. रिलायंस पीक विमा प्रकरणात कंपनीने मलिदा लाटुन तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यां तोंडाला पाने पुुसली आहेेत. यात सुमारे साडे तेरा कोटी पेक्षा अधिक रक्कमेचा पिक विमा रिलायन्स इनश्युरंस कंपनीने प्रशासकीय चुकांमुळे नाकारला आहे. हक्काचे साडे तेरा कोटी रुपये मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आंंदोलने मात्र सरकारवर  त्याचा काही परिणाम झाला नसल्याने परभणी जिल्हा पिक विमा संघर्ष समितीने या प्ररश्नावर आंदोलनाची हाक दिली होती, त्यांच्या  हाकेस प्रतिसाद देत सोनपेठ तालुका संपुर्ण बंद ठेवण्यात आला होता.
आज शहराच्या शिवाजी चौक येथे सकाळी ११.३०पिक विमा संघर्ष समिती व सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन तास चक्का जाम करण्यात आले, दोन तास चाललेल्या चक्काजाम मुळे वाहानांच्या लांंबच लाब रांगा लागल्या होत्या. प्रशासकीय चुकांमुळे शेतकर्‍यांच्या हक्काचे साडे तेरा कोटी रुपये त्वरित मिळवण्याची मागणी करीत रिलायन्स कंपनीच्या तुघलकी कारभाराचा निषेध करून घोषणा देत रोष व्यक्त केला.
दुपारी पिक विमा संघर्ष समितीच्या वतीने सोनपेठ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार बी.आर घोडके यांनी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांचे निवेदन स्विकारले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी पिक विमा संघर्ष समिती चे विश्वंभर गोरवे, शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदु, संभाजी ब्रिगेडचे शिवाजी कदम, शिवसेनेचे रंगनाथ रोडे, अशोक यादव, रावसाहेब पांडुळे, आनंद गुजराथी, कारभारी चांभारे, राष्ट्रवादीचे सुनील बर्वे, सैफुल्ला सौदागर, जगन्नाथ कोलते, सुदर्शन कदम, ईरशाद कुरेशी, शेतकरी संघटनेचे माऊली जोगदंड, आण्णा जोगदंड, अंगद काळे, देवीदास भुजबळ, लालसेनेचे ज्ञानेश्वर मोरे, छावाचे रवी जोगदंड, भारीप बहुजन महासंघाचे रुस्तुम तुपसंमुद्रे, शिरोरीचे गोपाळराव यादव, नितीन हारकाळ, मनसेचे तुळशीराम गांगर्डे, दिपक काटे यांच्या सह तालुक्यातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें