पालम शहरात बुधवारी.( *अपना मक़ाम पैदा कर*) विद्यार्थी,शिक्षक व पालकांसाठी शैक्षणिक सम्मेलनात सामिल व्हा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 जुलाई 2018

पालम शहरात बुधवारी.( *अपना मक़ाम पैदा कर*) विद्यार्थी,शिक्षक व पालकांसाठी शैक्षणिक सम्मेलनात सामिल व्हा.



पालम/अनीस खुरेशी

पालम शहरातील मदरसा अरबीया सालमतुल खादेमा व तालीमुल कुरआन.या मदरशा समोरील मैदानावर बुधवारी दुपार दोन वाजता अंतराष्ट्रीय प्रेरणा कोच,प्रमूख वक्ते व राबता फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सय्यद सईद अहेमद सर यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहे.
परभणी येथील दि.मेमन मर्चंट असोसिएशन,व परभणी एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  *अपना मक़ाम पैदा कर*) *विद्यार्थी,शिक्षक व पालक शैक्षणिक सम्मेलनात* संपुर्ण परभणी जिल्ह्य़ात आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे कनव्हिनर डाॅ.सलीम मोहियोद्दीन  साहब आहे तर काॅर्डीनेटर मो.नासेर खान मुख्याध्यापक डाॅ.जाकेर हुसैन ऊर्दू शाळा पालम, स्वागताध्यक्ष जफरूल्ला खान,व मो.जियाओद्दीन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमानउल्ला खान साहब तर मार्गदर्शन म्हणून इंजीनियर मोहम्मद अब्दुल रशीद साहब आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जमीयत उलेमा ए हिंदचे पालम तालुकाध्यक्ष मौलाना मो.मुदस्सीर साहब क़ासमी,मौलाना महेफुज़ अली बेग साहब हुस्सामी, मौलाना मो.रफीक साहब इशाअती,हिदायतुल्ला खान साहब, मा.सभापती शेर खान साहब अमीर साहब पालम,असदउल्ला खान व सर्व नगर पंचायत सदस्य उपस्थित राहणार आहे.
*(अपना मक़ाम पैदा कर) विद्यार्थी,शिक्षक व पालक शैक्षणिक सम्मेलनात*
उपस्थित राहण्याचे आवाहन अकबर खान,रशीद खान,गौसोद्दीन भाई पत्रकार,अनीस खुरेशी पत्रकार,सलमान खान,शेख जावेद,हबीब जाफर,हक्काणी पठाण,फैसल चाऊस,सय्यद विखार,मो.युनुस,असलम खान,जब्बार भाई,एज़ास खानसह आदींनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें