लहान मुले व विद्यार्थी तंबखु व गुटख्याच्या सुगंधीकडे वळताहेत.
शे.सलिम.भोकरदन प्रतिनिधी : केंद्रासह राज्याने बंदी घातलेल्या सुंगद तंबाखू व गुटख्याची भोकरदन शहरात सरा॔स पणे सुगंध सेंटर व पानटपरी वरून हजारों रूपयांची विक्री केली जात आहे या सुंगध धारकांना गुटखा वाल्यांना अभय कोणाचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे भोकरदन मधुन इतरांना स्वंतत्र गुटखा व सुगंधी तंबाखू नेवुन पोहोचविला जात आहे गुटखा शोकीणाचे चोचले पुरवण्यासाठी गुटख्याची किंमत चारपट वाढुन विकली जात आहे सर्वच गुटखा बंदी व्हावी असा आदेश असताना भोकरदन शहर व तालुक्यात मात्र या आदेशाला केराची टोपली शासनाच्या कर्मचाऱ्यांने दाखवली आहे सरा॔स पणे दररोज बस स्थानकाच्या आवारात व मेन मार्केट मध्ये सुंगधी तंबाखू व गुटखा विक्री सुरू आहे. अन्न औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे ,गुटखा सेवनामुळे अनेकांना तोंडाचे कैंसराची लागण झालेली आहे. भोकरदन व विदर्भा सह तेलंगणातील गुटखा विक्रेत्यांनी आपली जाळे मराठवाड्यात पसरवली आहे पोलिस.अन्न औषधे प्रशासन केवळ देखाव्या पुरत्या कारवाया करून ती कारवाई गुंडाळली जाते साधा तंबाखू असलेल्याचे सांगुन सुंगधी तंबाखू खुलेआम विक्री केली जात आहे या तंबाखू बंदीचा अनेकदा तटनठ्य पोस्टरबाजी तसेच व विद्यार्थ्यांचे तंबाखू बंदीसाठी व्याख्याने सुध्दा आयोजित केली जातात मात्र शासनाचे अधिकारी डोळ्यासमोर सुंगधीत तंबाखू ची विक्री केली जात असताना कारवाई करत नाही .भोकरदन शहरात गुटखा तस्करांनी आपले ठाण मांडले असुन यातुनच गुन्हेगारीची पाश्र्वभूमी तषार होत आहे या गंभीर व्यवसाय वर तालुक्यातील अधिका-यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस पावले उचलुन गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करण्यावर कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी शहारातील सुजाण नागरिकांकडून होत आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें