मानवत कडकडीत बंद ; शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 जुलाई 2018

मानवत कडकडीत बंद ; शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी!


मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२४: मराठा संघटनाकडुन पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ला मानवत तालुक्यात मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन शहरातील व्यापाऱ्यांनी  आज दि.२४ जुलैरोजी आपली प्रतिष्ठाने कडकडीत बंद करुन मराठा मोर्चाच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
सकाळपासुनच हजारोच्या संख्येने आंदोलनकारी रसत्यावर उतरले होते यावेळी सकाळपासुनच एस.टि.महामंडळाच्या बसा हि बंद करण्यात आल्याहोत्या यामुळे प्रवाशाचे फार हाल झाले तसेच शाळा कॉलेज हि बंद करण्यात आले होते
सकाळी दहा वाजता मराठा आंदोलनकारी महाराणा प्रतापसिंह चौकात जमा होऊन तेथुन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मेनरोड मार्गाने मोढापर्यत पायी जाऊन तेथुन पुन्हा तहसिल कार्यालय येथे सुरु असलेल्या धरणे आंदोलनात सामील झाले.
यावेळी प्रथम औरंगाबाद येथील आंदोलनकारी कै. काकासाहेब शिंदे  यांनी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी  जलसमाधी घेतली होती यावेळी त्यांना  दोन मिनीट मौन पाळुन श्रध्दाजली वाहण्यात आली
तसेच यावेळी शहरातील जमीयत उलेमा व विविध संघटनानी आपला जाहिर पाठिंबा दिला यावेळी मराठा समाज बांधवातील युवकांनी व पाठिंबा देणाऱ्या संघटनानी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी गजानन बारहाते ,मौलाना सलीम,रिज्वान सर,हमीद मौलाना,लिंबाजी कचरे पाटिल,सुनील जाधव आदीनी आपले मनोगत व्यक्त करुन मराठा समाजाच्या मागण्या रास्त असुन शासनाने लवकरात लवकर मान्य करावे अशी मागणी केली आहे.यावेळी तहसिल कार्यालय येथे उपविभागीय पोलीस अधिकारि रेणुका वागळे यावेळी उपस्थीत होत्या तसेच यावेळी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता .मानवत बंद शांततेत पार पडले असुन कोणताही अणुचित प्रकार घडला नाहि माञ हे आंदोलन किती दिवस शांततेत चालणार ? अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें