सराटी गावात काँग्रेस पक्ष पदाधिका-यांचा सत्कार सोहळा संपन्न ;
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.०२ ) -
वाडी - वस्ती - तांड्यांसह ग्रामीण भागातील नवयुवकांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवित आपल्या संघटनातूनच गोरगरिबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करावे. सामाजिक - सांस्कृतिक उपक्रम राबविण्याबरोबरच काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठीही सतत सक्रिय राहावे असे आवाहन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सिल्लोड तालुक्यातील सराटी, बोदवड, खंडाळा, पिंपळदरी, गोळेगाव, मुकपाट, वसई, जळकी, हळदा, डकला, अनाड आदी गावांतील शेतकरी - शेतमजुर - नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन अडी अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या पदाधिकऱ्यांना त्यांनी पक्ष बुथ समन्वयक नोंदणी व युवक काँग्रेसच्या क्रियाशील नोंदणीचे पक्ष कार्य मनापासून करतांना सामान्य जनतेच्या समस्यांही सोडविण्याचे प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.सदस्य नोंदणी मोहीमेसंबंधी आढावा घेतला.
काँग्रेस पक्षाच्या बुथ समन्वयक नोंदणी व युवक काँग्रेसच्या क्रियाशिल सदस्य नोंदणी मोहिमेंसंदर्भात गावा गावातील काँग्रेस पक्ष कार्यकर्ते नागरिकांसह नवतरूणांशी चर्चा करीत बुथ समन्वयक नोंदणी व युवक काँग्रेसच्या क्रियाशील नोंदणीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, बाजार समिती संचालक सतिष ताठे, अमित आरके, राजुमियाँ देशमुख, राधेश्याम अग्रवाल, मनोज झंवर, आत्माराम गुळवे, भिमराव नरवाडे, माणिकराव नरवाडे, अनिल गुळवे, आप्पा घायवट, समाधान गायकवाड, शिवाजी घायवट, योगेश गुळवे, अनिल चिंचपुरे, कृष्णा गुळवे, सुनिल गुळवे, जनार्दन गायकवाड, दादाराव गायकवाड, सोमीनाथ गायकवाड, दिनकर नरवाडे, रमेश गुळवे, ताराचंद घायवट, संतोष घायवट, खंडू बुरंगे, योगेश नरवाडे, रामचंद्र घायवट, देविदास घायवट आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सराटी येथे काँग्रेस पक्ष पदाधिका-यांचा सत्कार सोहळा संपन्न.....सिल्लोड तालुक्यातील सराटी येथे काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. नगराध्यक्ष अब्दुल समीर ,काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,राजुमिया देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश ताठे,मनोज झंवर, अमित आरके,राधेश्याम अग्रवाल, आदिंसह पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा सराटी येथील युवक काँग्रेस पदाधिका-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें