आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न;
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.०२ ) -
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी नॅशनल मराठी हायस्कुल जयभवानी नगर येथील शाळा परिसरात वृक्षरोपण करतांना व्यक्त केले.
सिल्लोड शहरातील नॅशनल मराठी माध्यमिक विद्यालय परिसरात नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले. माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस खुपच कमी होत आहे त्यामुळे दुष्काळी स्थिती तिव्र होत आहे. परिणामी दुष्काळी स्थितीने बळीराजा खुपच हलाखीचे जीवन जगत आहे. पर्यावरणाचा होत असलेला -हास आणि जागतिक तापमानवाढीवर उपाय हा केवळ मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत वृक्षसंवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक कायंदे, माजी पंचायत समिती सभापती विजयआबा दौड, माजी उपनगराध्यक्ष विठ्ठलराव सपकाळ, प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी, संजय मुरकुटे, कुणाल सहारे, अमित आरके लक्ष्मण कल्याणकर, मनोहर आरके, सखाराम अहिरे, चंदू बोर्डे, अन्वर पठाण, गायकवाड, सुधाकर पाथ्रीकर, अब्दुल बासित, रवि आरके, राजू साठे आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें