सिल्लोड (प्रतिनिधी) दि 24
राज्यभर सुरु असलेल्या मराठा ठिय्या आंदोलनास अनुसरून सिल्लोड येथे तहसिल कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या ठिय्या आंदोलनास काँग्रेस पक्षाचे वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी - कार्यकर्ते या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील झाले होते. यावेळी काँग्रेस पक्षाचे वतीने जाहीर पाठिंबा असल्याचे निवेदन सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना तसेच तहसीलदार संतोष गोरड यांना काँग्रेस पक्षाचे वतीने निवेदन देऊन सकल मराठा समाजाच्या मागणीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा व काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर,काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, शांतीलाल अग्रवाल, प्रा.मन्सूर कादरी, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, सत्तार बागवान, रईस मुजावर पठाण, राजेंद्र गौर, संजय आरके, शेख बाबर, राजरत्न निकम, दामोदर गव्हाणे, सतिश ताठे, अर्जुन गाढे, अमित आरके, अशोक पालोदकर, हनिफ मुल्तानी, राजेंद्र बन्सोड, निजाम पठाण, पंडित गोडसे, संजय मुरकुटे, खालेद पटेल, राम सरोदे, शिवाजी गुळवे, अकिल देशमुख, मनोज झंवर, धैर्यशील तायडे, कुणाल सहारे, मतीन देशमुख, मधुकर बेंडाळे, राजेश्वर आरके, मनोहर आरके, एकनाथ शिंदे, सुभाष जाधव, दिपक साळवे, अशोक कांबळे, राजू साठे, रावसाहेब सिरसाठ, सखाराम अहिरे, अब्दुल बासित, जगन्नाथ कुदळ, अमोल कुदळ यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें