प्रावाश्यात भीतीचे वातावरण .
(भोकरदन प्रतिनिधी)शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर एका ६५.वर्षीय वक्तीला भेसळ अधिकारी दाखवुन तीन हजार पाचशे रुपये एका अज्ञात चोरट्यांनी हिसकुन पोबारा केला आहे ज्यामुळे नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले भाऊसिंग मानसिंग पवार वय ६५वर्ष रा.जडपिंप्री ता.चाळीसगाव हे सिपोरा बाजार येथील रामेश्वर साखर कारखान्याचे कर्मचारी असुन ते दि.२९.रविवारी दुपारी एक विजेच्या सुमारास एसटी बस ने येणार्या पत्नीला नेण्यासाठी बस स्थानकावर आले होते त्या दरम्यान एक अज्ञात वक्ती त्यांच्या जवळ येवुन सांगतो मी भेसळ अधिकारी आहे तुमच्या खिश्यात तंबाखू आहे मी आजपर्यंत दहा लोकांवर कारवाई केली तुम्ही पोलीस ठाण्यात चाला जवळ असलेले पोलीस कर्मचारी येण्या आगोदर तीन हजार पाचशे रुपये घेवुन पोबारा केला विषेश म्हणजे बस स्थानकावर लावण्यात आलेले सी सी टीव्ही कॅमेरा त्या चोरट्याचा तोंडाला रुमाल लावेल होता त्या मुळे त्याची ओळख पटली नाही या पुर्वी असे अनेक घटना घडले आहे ज्यामुळे नागरीकासह प्रवाश्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान पोलीसांनी केली आहे तसेच शहरात कोणताही अनोळखी वक्ती आढळून आले तर तुरंत पोलिसांना संपर्क साधावा असे पण पोलीसांनी सांगितले आहे या विषय पोलीस तपास करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें