रिलायन्स पिक विमा प्रकरणी सोनपेठ येथे आज बंद व उद्या चक्काजाम आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 जुलाई 2018

रिलायन्स पिक विमा प्रकरणी सोनपेठ येथे आज बंद व उद्या चक्काजाम आंदोलन.


आंदोलनात सहभागी होण्याचे सर्वपक्षीयांच्या वतीने आवाहन.

सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०५जुलै २०१८
सन २०१७-१८च्या पीक विम्याचे पैसे भरूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ न दिल्याबद्दल परभणी जिल्ह्यात आज बंद व उद्या दि.०६जुलै २०१८ रोजी चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात सर्वपक्षीयांचा समावेश असनार असून जास्तीत जास्त शेतकरी व व्यापारी बांधवांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहनही आयोजकांनी केले आले आहे. सोनपेठ येथेही  या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारचे आज बंद चे उद्या चक्काजाम आंदोलन होणार आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच शेतकरी, विमा संघर्ष समिती व सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोनपेठ तहसीलदारांना दिले आहे. सोनपेठ शहरातील व्यापारी बांधवांनीही यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
गतवर्षी शेतकऱ्यांनी पिकांचा विमा मिळावा यासाठी पैसे भरले होते मात्र अद्याप पावेतो त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. यात रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून त्यांना विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले आहे; असा आरोप करीत आजच्या बंदचे व उद्याच्या चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत सोनपेठ तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर संभाजी ब्रिगेड परभणीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कदम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा. मुंजाभाऊ धोंडगे, भारिप सोनपेठ शहराध्यक्ष सुशीलकुमार सोनवणे आदींसह विविध पक्ष व संघटना कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें