घरात घुसून दहशतवाद्यांकडून जवानाची हत्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 30 जुलाई 2018

घरात घुसून दहशतवाद्यांकडून जवानाची हत्या.


जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी एका सीआरपीएफ जवानांची घरात घुसून हत्या केली आहे. सीआरपीएफ जवान नसीर अहमद राथेर सुट्टीवर पुलवामा येथील नायरामध्ये आपल्या घरी आले होते. दहशतवाद्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घरात घुसून जवानावर गोळीबार केला. जखमी अवस्थेत जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या दरम्यान जवानांचा मृत्यू झाला होता.
काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या शोपियां ज़िल्ह्यात पोलिसाचं अपहरण करण्यात आलं होतं. जावेद अहमद डार यांची अपहरण करुन हत्या करण्यात आली. कुलगाम येथे जावेद अहमद डार याचा मृतदेह सापडला. जावेद अहमद डार यांच्या शरीरावर गोळ्या लागल्या होत्या. जवानाच्या शोधासाठी शोध मोहिम देखील सुरु होती. पण यश नाही मिळालं. या घटनेच्या 1 महिन्याआधी शोपियांमध्ये देखील लष्कराच्या एका जवानाची अपहरण करुन हत्या करण्यात आली होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें