सिल्लोड येथे बहुजन समाज पार्टी सिल्लोड/ सोयगाव विधानसभा तर्फे राजर्षी शाहू महाराज व संत कबीर यांची जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 19 जुलाई 2018

सिल्लोड येथे बहुजन समाज पार्टी सिल्लोड/ सोयगाव विधानसभा तर्फे राजर्षी शाहू महाराज व संत कबीर यांची जयंती साजरी.



( शेख कलीम )

    सिल्लोड येथे 15/07/2018  बहुजन समाज पार्टी सिल्लोड सोयगाव विधानसभातर्फे लोकराजा राजर्षी शाहू महाराज तसेच संत कबीर यांची जयंती मोठ्या उत्साहात नर्मदाबाई मंगलकार्यलयात साजरी करण्यात आली.
      बहुजन समाज पार्टी सिल्लोड, सोयगाव विधानसभा तर्फे लोकराजा शाहू महाराज व संत कबीर यांची संयुक्त जयंती निमित्त सिल्लोड येथील नर्मदाबाई मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी बहुजन समाज पार्टी नाम फलकाचे अनावरण सुध्दा करण्यात आले.नर्मदाबाई मंगलकार्यालयात 8 वी , 9 वी,10वी,12 वी चे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव करून शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टी चे  प्रदेश कोषाध्यक्ष नदीम चौधरी उर्फ गुड्डू भाई  प्रदेश सचिव किशोर म्हस्के मुरदाबादचे बसपा प्रचारक मोहम्मद अरशद भाई जिल्हा अध्यक्ष महेंद्र भाऊ सोनवणे प्राध्यापक प्रा.सिद्धार्थ टाखानकर जिल्हा  प्रभारी सचिन बनसोडे , जिल्हा महासचिव जगदीश बेदवे,अंबादास रगडे, यांचे भाषणे झाली. या वेळी प्रदेश कोषाध्यक्ष नदीम चौधरी उर्फ गुड्डू भाई  यांनी सांगितले की येणाऱ्या 2019 मध्ये बहन मायावती देशाची प्रधानमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा अध्यक्ष महेंद्र सोनवणे यांनी  आपल्या भाषणात छत्रपती शाहू महाराज तसेच संत कबीर यांच्या जीवनावर सखोल मार्गदर्शन केले.या वेळी जिल्हा सदस्य प्रेमदास त्रिभुवन कन्नड विधानसभाअध्यक्ष  शिवाजी बन, फुलंब्री विधानसभा अध्यक्ष भगवान गंगावणे, कन्नड  शहर अध्यक्ष  शेख अकिल भाई  उपस्थित होते या वेळी अरुण खरात यांचा  भीमगीत व कव्वाली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महासचिव जगदीश बेदवे, जिल्हा प्रभारी  शेख अक्रम ,विधानसभा अध्यक्ष संदीप सुरडकर,  विधानसभा कोषाध्यक्ष भाऊसाहेब सुरडकर, विधानसभा महासचिव संदीप जोगदंडे, बी. व्ही.एफ.संयोजक अमोल भिवसने, सचिव अमोल सुरडकर ,ओबीसी भाईचारा समितीचे विधानसभा अध्यक्ष संतोष वाघ ,ओबीसी भाईचारा समितीचे शहर अध्यक्ष कृष्णा वाघ ,रत्नाकर वाघ ,पंडित बोर्डे, दिलीप वाघ,संतोष बोर्डे,सुनील सुरडकर, बसपा शहर अध्यक्ष राहुल दांडगे,युवराज तायडे,जितेंद्र खरात,संजय साळवे, भास्कर सरोदे,प्रसंनजीत,संतोष गायकवाड, किसन कटारे, रामजी खरात,प्रभाकर आव्हाड, डॉ. कडूबा शिंदे आदी सह बहुजन समाज पार्टीचे सिल्लोड सोयगाव विधानसभा तसेच शहरातील बसपा चे कार्यकर्ते,हितचिंतक व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औरंगाबाद जिल्ह्यातील बसपा जिल्हा प्रभारी शेख अक्रम यांनी केले. तर आभारप्रदर्शन सिल्लोड सोयगाव विधानसभा अध्यक्ष बसपा संदीप सुरडकर यांनी मांडले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें