आश्वी बु. येथे जैन श्रमण संघाकडून चातुर्मासचे आयोजन अति उत्साहात संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 19 जुलाई 2018

आश्वी बु. येथे जैन श्रमण संघाकडून चातुर्मासचे आयोजन अति उत्साहात संपन्न.


आश्वी प्रतिनिधी (अमोल राखपसरे )
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु. येथे जैन श्रमण संघाच्या वतीने चातुर्मासचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त साध्वी प. पु. सुनंदाजी महाराज, प. पु. शुभदाजी महाराज, प. पु. सुविज्ञाजी महाराज, प. पु. भारवीजी महाराज यांचे आश्वी बु. येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. तर राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या सुशिष्या, शासन प्रभाविका सुशीलकंवरजी महाराज यांच्या सुशिष्या साध्वी सुनंदाजी महाराज व ठाणा ४ यांचे हि आश्वी येथे चातुर्मास निमित्त आगमन झाले आहे.
यावेळी स्वरुपचंद गांधी मार्केटपासुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी आश्वी इंग्लिश स्कुलच्या मुलीनी मंगल कलश घेऊन, मांची हिल शैक्षणिक संकुलाचे लेझीम व बॅन्ड पथक, भगवे फेटे परिधान केलेल्या शेकडो महिला, पुरुष, आनंद बाल मंडळ व कन्या मंडळ या शोभायात्रेत मोठ्या उत्संहाने सहभागी झाले होते. याप्रसंगी गावातील प्रवेशद्वारावर जैन ध्वज लावुन प्रत्येक चौकात शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परीषद सदस्या अँड. रोहिणीताई निघुते, सरपंच महेश गायकवाड, उपसरपंच राहुल जऱ्हाड, विनायक बालोटे, अशोक म्हसे, बाळासाहेब गायकवाड, केदार बिहाणी, पंकज नाके, मंगेश रासने, पंकज कोळपकर, सत्तारभाई तांबोळी आदिनी शोभायात्रेचे स्वागत केले.
याप्रसंगी साध्वी प. पु. सुनंदाजी महाराज म्हणाल्या की, हा चातुर्मास जैन बांधवासह सर्वासाठी खुला असून ही आश्वी व पंचक्रोशीतील भाविकासाठी धार्मिकं आचार-विचाराची मांदियाळी आहे. या चार महिन्यात प्रार्थना, व्याख्यान, महिला व युवकांसाठी धर्मचर्चा आदींसह विविध धांर्मिक कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी नवकार ग्रुप, आनंद बाल मंडळ, बहु मंडळ आदिनी विविध कार्यक्रम सादर केले. दरम्यान यावेळी अहमदनगर, केडगाव स्टेशन, जुन्नर, नारायणगाव, वाघोली, चांदा, अकोला, संगमनेर, राहुरी, सिध्दाचलम, तिसगाव, श्रीरामपुर, कडा, नेवासा, पळशी, खडकवाडी, दौंड आदि ठिकाणासह महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यातून आलेले जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित भाविकासाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी व अविनाश गांधी यांच्या वत्तीने गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचलन सुशिल भंडारी यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें